JAY JINENDRA

Post Top Ad

Jan 4, 2019

श्री चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर महान

 

     श्री चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर महान                  ता.बार्शीटाकळी जि अकोला

महान :-- पूर्णखेड (काटेपूर्णा)हे गाव महान पासून 25 किलो मिटर आहे. या गावात जैन समाजाचे 5-6 घरे वास्तव्यास होती काही काळानंतर  या गावांमध्ये महामारी (बिमारी)वाढली त्यामुळे येथील वास्तव्यास असलेले लोक मरणपावत असल्याने येथील जैन कुटुंबीयांनी श्री आदिनाथ भगवंताची मूर्ती या गावातून हलविण्याचे ठरवीण्यात आले 
         त्याकरिता बाहेरवावचे श्रावक मूर्ती घेऊन जाण्यासाठी आले पण श्री आदिनाथ भगवंताची मूर्ती हल्लीच नाही हा चमत्कार पाहून श्रावक अचंबित झाले. महान येथील काही श्रावकानी आदिनाथ भगवंताची मूर्ती बैल गाडीने नेत असताना जिथे बैल गाडी थांबली तेथे श्री आदिनाथ भगवंताच्या समोर श्रीफळ (नारळ)फोडले यामध्ये दोन पोते नारळ लागले.रस्त्याने जात असतांनी एक आंब्याच्या वृक्षाखाली मूर्ती व श्रावकांचा व गावातील श्रावकांचा  मुक्काम झाला.चमत्कार असा झाला  की भर उन्हाळ्यात आजू बाजूने पाऊस पडला मात्र श्री आदिनाथ भगवंताच्या आंब्याच्या वृक्षापासी पाऊस पडलाच नाही.त्यामुळे भगवंताची मूर्ती ही अतिशय चमत्कारी आहे.भगवंताची मूर्ती नेत असतांनी तीन दिवस लागण्या ऐवजी आठ दिवस लागले कारण की आजू बाजूच्या परिसरात भरपूर पाऊस झाला होता.महान येथे आल्यावर श्री आदिनाथ भगवंताची प्राण प्रतिष्ठा येतील श्रावकांनी केली.
         विशेष म्हणजे श्री आदिनाथ भगवंताचे तीन रूपे दिसतात सकाळी बालपण दुपारी तरुणपण सायंकाळी म्हातारपण असे येथील श्रावक-श्रविकांचे म्हणणे आहे.तसेच श्री चंद्रनाथ स्वामी भगवानची मूलनायक अतिशय प्राचीन मूर्ती प्रस्थापित आहे.
                                                                                                                                                   एक श्रावक

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages