श्री पंचक्षेत्रापालजी महाराज वार्षिक उत्सव
पेहणी :- येतील श्री पंचक्षेत्रापालजी महाराज दिगंबर जैन मंदिर संस्थान पेहणी येते वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत.
श्री भारतवर्षीय दिगंबर जैन (तीर्थ समिती) महासभा यांच्यावतीने 150 वर्षे पुरातननिर्मित साक्षांत अतिशय युक्त चमत्कारी श्री पंचक्षेत्रापालजी महाराज दिगंबर जैन संस्थान पेहणी ता.हिंगोली येथे वार्षिक उत्सव पौष शु.शनिवार 5 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता चढाव व 11 वाजता अभिषेक व पूजन संगीतमय होईल.नंतर 1 ते 4 वाजेपर्यंत प्रभाकर कान्हेड,डॉ.विजय रोकडे,अनिल रोकडे,सागर बेगोत्रे यांच्यावतीने महाप्रसादचा कार्यक्रम राहील.
कार्यक्रमाला श्रावक-श्रविकानी वेळेवर उपस्तीत राहून पुण्यलाभ घ्यावा. कार्यक्रम निमंत्रण पत्रिका सौ सीमा संजय वाळले व सौ हेमा निशिकांत वाळले यांच्याकडून देण्यात आले आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज यांच्यावतीने करण्यात आले आहे.
टिप ::- पेहणी हे गाव नर्सिहून पश्चिमेस 3 कि. मी आहे एस. टी बस व ऑटो सुविधा आहे ता. हिंगोली जिल्हा हिंगोली
No comments:
Post a Comment