शिरपुर जैन येथील श्री अंतरिक्ष पाश्र्वनाथ मंदीर जगात सुप्रसिध्द तिर्थक्षेत्र असल्यामुळे या गावाला नावलौकीक प्राप्त झाले आहे. बस्ती मंदिर जिर्णोध्दार इ स१६ शताब्दी करण्यात आला मंदीरवर ध्वजारोहन करण्याचा अधिकार दिगंबर जैन समाजाला आहे या मंदीरात १६ दिगंबर तिर्थकरांच्या मुर्ती विराजमान आहेत २३ वे तीर्थकर अंतरिक्ष पाश्र्वनाथ भगंवान व पद्मावती देवीची संगमरवर की अतिसुदर मुर्ती मुळरूपात दिगंबर अवस्थेत स्थापीत आहे.शिरपूर गावाचा इतिहास पाहिला तर श्रीपाल राजा यांच्या काळात श्री अंतरिक्ष पाश्र्वनाथ भगवंताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या गावाला शिरपूर हे नाव प्राप्त झाले आहे.
वाशिम जिल्हात असलेल्या मालेगाव तालुक्यापासून पश्चिमेस ८ कि.मी वर वसलेल्या शिरपूर जैन गावाचा इतिहासनुसार शिरपुरची उत्पत्ती आख्यायिका मंनोरजक व कुतूहलपुर्ण आहे. एका भक्ताने आपल्या गुरूस दुधाने भरलेले भांडे दिले त्या गुरूने पर्शियन भाषेत याला दुग्धपूर्ण म्हटले. त्यावरून दुध म्हणजे क्षीर म्हणून क्षिरपुर, तर कुणी याला सिध्दपुरूष म्हटले. श्रीपाल भूपतिने आश्र्चयकारक पाश्र्वनाथ भगवंताची मुर्ती येथे आणून स्थपीत केली म्हणून हे श्रीपूर होय. तर कुणी या स्थळाला शिवपूर म्हणतात. आज याच गावाला शिरपुर जैन असे नावाने ओळखण्यात येते.
श्रीअंतरिक्ष पाश्र्वनाथाच्या मुर्तीचा चमत्कारीक असल्यामुळे दिगंबरी व श्वेतांबरी पंथामध्ये गत २५ ते ३० वर्षापासून ते आजपर्यंत वाद सुरूच आहे. शहरातील सर्वच जैन मंदिरामध्ये मुर्ती दिगंबरी पंथाच्याच आहेत. आजुबाजूच्या परिसरातही दिगंबरी समाज बहुसंख्येने राहतो. प्रतिवर्षी येथे कार्तिक पौर्णिमेस दिगंबरी जैनाची येथे भव्ययात्रा भरत असते.
पुर्वी शिरपूर शहराच्या बाहेर पश्चिमेला अतिशय प्राचिन पवळी मंदीर आहे. आज हेच मंदीर शहरात आले आहे. एलिचपूरच्या राजा ईल याने सदर मंदीर बांधल्याचे इतिहासात नमुद आहे. पवळी मंदिराच्या पूर्वाभिमुख रस्त्यावरील महाव्दारावरील शिलालेखावर संवत १३३४ (इ.स.१४०६) अंतरिक्ष पाश्र्वनाथ असे लिहिले आहे. पवळी मंदिराजवळ उत्खननात ज्या विटा सापडल्या त्या पाण्यावर आजही तरंगतात. याबाबत प्रत्यक्ष प्रयोग करुन आजही पवळी मंदिरामध्ये पहावयास मिळतो. तसेच पवळी मंदिरात असलेल्या विहिरीच्या पाण्याने पाश्र्वनाथ भगवान मुर्तीचा अभिषेक केल्याने व त्याच विहिरीच्या पाण्याने श्रीपाल राजाने स्नान केल्यामुळे श्रीपाल राजा चा कुष्ठरोग बरा झाला.
शिरपूर जैन या ठिकाणी जैन समाजाची शिरपूर जैन येथील श्रीअंतरिक्ष पाश्र्वनाथाचे मंदिरामुळे मात्र मालेगाव तालुक्यासह शिरपूरचे नाव हे जगाच्या नकाशात झळकत आहे तर त्यामुळे हे क्षेत्र हे प्रसिध्द तिर्थक्षेत्र म्हणून नावलौकीकास आले आहे.
महाविर टिकाईत,शिरपुर
No comments:
Post a Comment