JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 2, 2018

पालकांनी आपल्या पाल्याला गोवर रूबेलाची लस अवश्य द्यावी- डॉ.उपाध्ये

कारंजा : शासनाने गोवर रूबेला लसीकरण हा राष्ट्रीय उपक्रम म्हणून जाहीर केला असून शासनाच्या विविध स्तरावरून त्याबाबतीत जनजागृती केल्या जात आहे. परंतु अद्यापही कारंजा शहरातील काही उर्दू शाळातील पालक आपल्या पाल्यांना गोवर रूबेला लस देण्यास नकार देत आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना गोवर रूबेलाची लस अवश्य टोचून घ्यावी असे आवाहन कारंजा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा उपाध्ये यांनी केले आहे
कारंजा उपजिल्हा रूग्णालया अंतर्गत २९ नोव्हेंबरपर्यत शहरातील विविध शाळातील १२६४ जणांना गोवर रूबेला या लसीचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली. सदर रूग्णालयाला २ हजार २४५ जणांना लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत उद्दिष्ट पुर्तीच्या ५६ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. गोवर रूबेला ही लस ९ महिन्यापासून १५ वर्षापर्यंतच्या मुलामुलींना देण्यात येते. भविष्यातील आजारावर नियंत्रण मिळविता यावे या उद्देशाने शासनाने गोवर रूबेला लसीकरण ही मोहीम हाती घेतली असून विस्तृत प्रमाणात लसीकरणासाठी प्रयत्न केल्या जात आहे. उपजिल्हा रूग्णालया अंतर्गत २७ व २८ नोव्हेंबरला ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ४२९, ५ ते १० वर्ष वयोगटातील १८१, तर १० ते १५ वर्ष वयोगटातील १७६ अशा एकुण ७८७ मुला-मुलींना तर २९ नोव्हेंबर रोजी ४७७ जणांना गोवर रूबेलाची लस देण्यात आली आहे.  लसीकरण वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम तपासे यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत केल्या जात आहे. या लसीकरणासाठी उपजिल्हा रूग्णालय कर्मचारी परिश्रम घेत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages