वाशिम : जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय वाशिम अंतर्गत पथकनिहाय रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डचा अनुशेष भरुन काढण्याच्या दृष्टिने १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजतापासून पोलिस मुख्यालय मैदान वाशिम येथे वाशिम पथका अंतर्गत ३४ पुरुष उमेदवार आणि ३७ महिला उमेदवार, तसेच मंगरुळपीर पथका अंतर्गत ३६ पुरुष उमेदवार व २४ महिला उमेदवार, असे दोन्ही पथक मिळून एकूण ७० पुरुष व ६१ महिला उमेदवारांची भरती आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पुरुष व महिला उमेदवार होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता इच्छुक असलेल्यांनी सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालय मैदान येथे उपस्थित रहावे. दुपारी १ नंतर आलेल्या होमगार्ड उमेदवारांचा भरतीसाठी विचार केला जाणार नाही. होमगार्ड सदस्य नोंदणीकरिता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावी, पुरुष उमेदवाराची उंची १६२ से.मी. व महिला उमेदवाराची उंची १५० से.मी. असावी, नोंदणीचे वय २० ते ५० वर्ष असावे, पुरुष उमेदवाराची छाती ७६ से. मी. व फुगवून ८१ से. मी. असावी, उमेदवार शारिरीकदृष्ट्या व वैद्यकीय दृष्य पात्र असल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाNयाचे प्रमाणपत्र जोडावे, पोलिस चारित्र्य अहवाल अनुकूल असावा, रोजगार/ बेरोजगार व्यक्तीला होमगार्ड नोंदणीमध्ये सहभाग घेता येईल. उमेदवार जर शासकीय/ निमशासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असेल तर संबंधित कार्यालय प्रमुखांचे होमगार्ड सदस्य नोंदणा rकरिता वेळोवेळी कत्र्यव्यावर उपस्थित राहणे संबंधात मंजूरी सहमतीचे नाहरकत प्रमाणपत्र असावेत. यापूर्वी संघटनेत असलेल; परंतू गैरवर्तन, अफरातफर तसेच न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले व संघटनेने काढून टाकलेले होमगार्ड उमदेवार नोंदणीसाठी विहीत अटी पूर्ण करीत असेल तरी त्यांना पुन्हा संघटनेत घेता येणार नाही. उमेदवारांना विहीत वेळेत धावणे व गोळाफेक चाचणी द्यावी लागेल. पुरुष उमेदवाराकरिता धावणे १६०० मीटर व महिला उमेदवाराकरिता ८०० मीटर आहे.
सदस्य नोंदणीसाठी येणाNया उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, १०/१२ वीचे बोर्ड सर्टिफिकेट, अधारकार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, तांत्रिक शिक्षण असलेले प्रमाणपत्र उदा. जडवाहन चालक परवाना, आयटीआय, एनसीसी-बी किंवा सी प्रमाणपत्र, जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय खेळाडू प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्रकासह छायांकितप्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड मोक्षदा पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment